मुलीचा अश्लिल व्हिडिओ तिच्याच वाढदिवसाला केला व्हायरल; गुन्हा दाखल

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
आर्वी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ तयार करुन तिच्याच वाढदिवसाच्या दिवशी व्हायरल केला, असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्वी शहरातील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून एका मुलीचा अश्लिल व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करुन तिच्या वाढदिवशीच सोशल मीडियावर व्हायरल करुन मुलीची बदनामी करुन विनयभंग केला. प्रकरणाची तक्रार अमरावती येथील गाडगेनगर पोलिसात दाखल झाली आहे. मात्र, घटनास्थळ आर्वी शहरातील असल्याने हे प्रकरण आर्वी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.
अमरावती येथील अल्पवयीन मुलगी आर्वीत शिक्षणासाठी असताना सप्टेंबर २०२० मध्ये तिची ओळख गौरव घोडेस्वार नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने तिच्याशी जवळीक साधून तिला आर्वी येथील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून स्वत:च्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ चित्रित केले. यावेळी मुलीने त्याला नकार दिला.
१ सप्टेंबर २०२२ रोजी मुलीचा वाढदिवस असल्याने ती तिच्या कुटुंबियासोबत अमरावती येथील घरी असताना तिच्या चुलत भावाने मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर वर्षभरापूर्वी गौरवने काढलेला दिसला. तो व्हिडिओ आरोपी गौरव याने स्वत:च्या स्टेटसवर ठेवला होता. यामुळे मुलीची बदनामी झाली. अखेर मुलीने थेट अमरावती येथील गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली.
तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
अमरावती जिल्ह्याच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करुन सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत आर्वी पोलिसांकडे वर्ग केले. आर्वी पोलिसांनी याप्रकरणात आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती आर्वी पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!