सिंदीत संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी.
🔥 जयंतीनिमित्त लंगरचे आयोजन
सिंदी (रेल्वे) : येथील संत जगनाडे चौकामध्ये तेली समाज बांधवांकडून जगतगुरू तुकोबारायांचे परम शिष्य संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या अनुषंगाने संत जगनाडे महाराज चौकामध्ये संत जगनाडे महाराजांची मोठी प्रतिमा तयार करण्यात आली होती. याठिकाणी रांगोळी काढून मंच सजविण्यात आला होता. तसेच चौकामध्ये पताकाही लावण्यात आले होते. याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांच्या तईलचित्राचे पूजन अध्यक्ष मंगलमूर्ती डकरे व अशोक डांगरे यांच्याहस्ते अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमानंतर समाज बांधवांकडून चौकामध्ये लंगरचे आयोजन करण्यात आले होते.संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले.या सोहळ्याला नाना बेलखोडे, उपाध्यक्ष नरेश डांगरे, अजय बोरकर, रवींद्र काटोले, दिलीप बोरकर, प्रभाकर मोरस्कर, अभिनव कलोडे, प्रेम राजपुरोहित, राजू पेठकर, अरविंद बोरकर, निळखंड घवघवे, नरेंद्र बोरकर, कपिल डकरे, हंसराज बेलखोडे, आकाश गवळी, राजेंद्र विणकाने, गंगाधर कलोडे, गणेश मोरस्कर, गजानन गिरडे, डॉ. आनंद विश्वास, राजू नागपुरे, रोशन फटींग, आशिप पठाण, जीवन डकरे, ऋषी बेलखोडे, सुरज घोडे, कुंडलिक बेलखोडे, गणेश डांगरे, शिवम तडस, दर्शन मोरस्कर, दीपक कलोडे, चैतन्य गोल्हर, भावेश डांगरे, नारायण मानकर, हिमांशु भुते, सुमित काटोले, सोहम बोरकर, प्रज्वल बोरकर आदींची उपस्थिती होती.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24