जय विकास महाविद्यालय शिरपूर होरे येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
देवळी : तालुक्यातील स्थानिक जय विकास महाविद्यालय शिरपूर होरे येथे क़ांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.मनोज ढोणे हे होते तर मंचावर प्रा.डाॅ.अमित दारूंडे प्रा. अवसरे,प्रा.भांदकर होत्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी दारुडे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जिवनपट उलगडून सांगितला तर प्रा.डाॅ.मनोज ढोणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मुळे आज सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत म्हणून सावित्रीबाई फुले यांचा आदर्श व संघर्ष आपण सदैव लक्षात ठेवुन मार्ग क्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सावित्रीबाई फुले यांच्या वरती कविता सादर केल्या या कार्यक्रमाला ,प्रा.लोखंडे,प्रा.राजुरकर प्रा.लाभे प्रा.पलवी लोखंडे,प्रा.वाजिद शेख, प्रा.गणेश धरत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मंगेश भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत माने यांनी मानले कार्यक्रमाची सांगता विद्यापीठ गीताने करण्यात आली.
सागर झोरे साहसिक न्यूज/24