अज्ञात दुचाकीच्या धडकेने महिला गंभीर जखमी,धानोली गावंडे येथील घटना.
सेलू : तालुक्यातील धानोली गावंडे येथील रोडच्या बाजूने जात असलेल्या महिलेला अज्ञात दुचाकी वाहन चालकाने जबर धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान धानोली गावंडे येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार संगीता दिलीप बावणे वय ३४ वर्ष रा. धानोली गावंडे ता.सेलू येथील रहिवाशी महिला अज्ञात दुचाकी वाहनाच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली तसेच संगीता दिलीप बावणे ही महिला आपल्या भावाच्या धानोडी बादरपूर या गावाला जाण्यासाठी बस स्थानक वर जाण्यास निघाली होती दरम्यान मागून अज्ञात मोटारसायकल ने तिला जबर धडक दिली यात त्यांना डोक्याला व छातीला जबर मार लागला तसेच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेत महिलेला ग्रामीण रुग्णालय सेलू येथें दाखल केले तेथे उपचार करून डॉक्टरानी सेवाग्राम येथे रेफर केले व घटना स्थळ वरून मोटारसायकल चालक पसार झाले.
साहसिक न्यूज /24 वर्धा
