गण गण गणात बोते ने दुमदुमला गजानन मंदिर परिसर..

0

शैलेश देशमुख व खुशबू कठाणे यांच्या भक्तिगीतीने रसिक मंत्रमुग्ध.

वर्धा / श्री. संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त स्थानिक गजानन महाराज मंदिरात भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी प्रगती संगीत विद्यालयातर्फे जीवन बांगडे यांच्या मार्गदर्शनात भक्तिगीतानाचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला.
वर्धेतील सुप्रसिध्द गायक शैलेश देशमुख व खुशबू कठाने यांनी एकापेक्षा एक अश्या सुमधुर रचना सादर केल्या. नमो नमो देवी या राग दुर्गा मधली बंदिश खुशबू कठाणे यांनी सादर करताच उपस्थितांची वाहवा मिळवली.त्यानंतर शेगाविचा माझा राजा गजानन, कानडा राजा पंढरीचा, खेळ मांडियेला, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, माझे माहेर पंढरी , या एका पेक्षा भक्ती गीते त्यांनी सादर केली. सुप्रसिध्द गायक शैलेश देशमुख यांनी सादर केलेली संत कबीर यांच्या रचना चदरिया झिली रे झीलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. तसेच अनंत गायकवाड वाशिम यांनी अनुप जलोठा यांच्या रचना गायन गेल्या. आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. तेजस्वी यांनी बंदिश सादर केल्या. तर डॉ. ममता कुमारी विश्वास यांनी अवध में राम आये है भक्तीगीत सादर केले. जीवन बांगडे यांनी तबल्याची साथ दिली तर कार्यक्रमाचे संचालन संदीप चिचाटे यांनी केले.
भजन संध्येला समाजसेवक मोहन अग्रवाल, नाना पहाडे,दिलीप रोकडे गजानन महाराज देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. भजन संध्येला मोठ्या प्रमाणात रसिकांची उपस्थिती होती.

 गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!