आष्टी(शहीद) /तालुक्यातील ग्रामपंचायत सुजातपुर येथील जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळाला आहे.दिनांक ३० मार्च रोजी पंचायत समिती आष्टी येथे तालुकास्तरीय गौरव पुरस्कार कार्यक्रमा अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका यांना गटविकास अधिकारी व गट शिक्षनाधिकारी यांच्या कडून एक लक्ष रुपयाचा धनादेश व शिल्ड देऊन गौरवण्यात आले.या वेळी पंचायत समिती आष्टी चे गट विकास अधिकारी बाळासाहेब यावले, गट शिक्षणाधिकारी प्रमोद देशपांडे, सुजातपुत ग्रामपंचायत सरपंच श्री. प्रविणभाऊ ठाकरे , शाळेचे मुख्याध्यापक श्री.मंगेश अतकरने सर व शिक्षक पेठे मॅडम व कर्मचारी उपस्थित होते.