वर्ध्यात निवडणुक आयोगाच्या गाडीवर कमळाचे चिन्ह…

0

उ.बा.ठा शिवसेना गटाने केली पोलिसात तक्रार..

वर्धा / लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे.याचे पालन केले जात असून वर्धा येथे निवडणुक विभागच्या कामावरील वाहनावर कमळाचे चिन्ह असल्याचे समोर आले आहे.वाहनावर कमळाचे चिन्ह दिसताच शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.आज वर्धेत महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी पक्षाकडून माजी आमदार अमर काळे आपला उमेदवारी अर्ज भरणार होते.या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते.तसेच रॅलीमध्ये काही प्रकार घडू नये यासाठी निवडणुक विभागची विविध पथके यासाठी तयार ठेवण्यात आली होती.यावेळी सर्वप्रथम स्थानिक वंजारी चौकातील स्वाध्याय मंदिर सभागृहामध्ये महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे नेते व खुद्द शरद पवार यांची भाषणे झाली.त्यानंतर सर्व कार्यकर्ते तसेच नेते यांनी रॅली काढून अमर काळे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणुक कार्यालयाकडे वाहनांचा ताफा घेवून निघाले.यावेळी निवडणुक आयोगाच्या एका वाहनावर कमळाचे चिन्ह असल्याचे शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.त्यांनी ही बाब आपल्या वरीष्ठांना सांगितली.हे आचारसंहितेचा भेग करणारी बाब असून याबाबत शिवसेना उबाठा गटाच्यावतीने रामनगर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करण्यात आली आहे.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!