मुलीच्या उपचारासाठी आई वडिलांनी राहते घर काढले विक्रीला…

0

१५ऑगस्ट रोजी झालेल्या अपघात प्रकरनाची अदयापही दखल नाही.

लालपरी नें धडक देऊन शालेय विध्यार्थी नीचा पाय मोडला,नऊ महिन्यापासून रुग्ण शाययवर

नरेश भार्गव / आष्टी शहीद तालुक्यातील पिलापूर येथील विध्यार्थीनि कु.चैताली संतोष राऊत ही आष्टी येथील हुतात्मा राष्ट्रीय विध्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत होती. दि.१५ऑगस्ट २०२३रोजी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे ती सकाळी शाळेत आली. कार्यक्रम आटोपून ती घरी जाण्यासाठी बस स्थानक परिसरात बस ची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात एक लालपरी आली आणि चैताली राऊत यां मुलीला धडक देत निघून गेली. यां धडकेत यां मुलीचा पाय मोडला होता. घटना घडून नऊ महिन्याचा कालावधी लोटला तरी तिच्या मदतीला कोणीच पुढे आले नाही. मुलगी दुरुस्त व्हावीऔषध उपचारासाठी पैसे आणायला मार्ग सापडत नाही म्हणून आई वडिलांनी चक्क राहण्याचे घरच विक्रीला काढले आहॆ.सविस्तर असें कि,पिलापूर गावातील भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील मुलगी कु. चैताली राऊत ही सातव्या वर्गात आष्टी येथील हुतात्मा राष्ट्रीय विध्यालायत शिक्षण घेत होती.स्वातंत्र्य दिन असल्यामुळे ती सकाळी आष्टी शहरात आली. शाळेतील कार्यक्रम आटोपलं म्हणून ती बस नें घरी जाण्यासाठी बस ची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात लालपरी नें जबर धडक देत दोन मुलांना गंभीर जखमी केलें. कु. चैताली हिचा पाय मोडला. उपचारासाठी तिला आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केलें. प्राथमिक उपचार झाल्यावर तिला पुढील उपचारासाठी एर्विन रुग्णालय अमरावती येथे दाखल केलें. तेथील डॉक्टर यांनी चैताली हिच्या पायावर शास्रक्रिया केली सात दिवस औषध उपचार केलें आणि सुट्टी दिली. मुलीला घरी आणले. तिनं महिने झाले तेव्हा पायात पुन्हा वेदना सुरु झाल्या म्हणून मग पुन्हा तपासणी करण्यासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालय गाठले. यां रुग्णालय मध्ये चांगला व वाईट अनुभव आला. म्हणून पुढील वाटचालीस सुरवात झाली अमरावती येथील खाजगी रुग्णालय मध्ये भरती केलें यासाठी एक लाख रुपये खरच आला. नऊ महिने झाले दोन वेळा ऑपरेशन करण्यात आले. आता ती मुलगी घरी रुग्ण शाययवर आहॆ. आई वडील यांनी लालपरी चालक यांच्यावर कार्यवाही व्हावी म्हणून आष्टी पोलीस ठाणे गाठले तेथे तिला न्याय मिळाला नाही. शेवटी अपघात ग्रस्त मुलीची आई सौं आशा हिने पोलीस अधीक्षक वर्धा यांना तक्रारी सादर केल्या. तक्रारी ची अदयापही चॊकशी करण्यात आली नाही. लालपरी च्या चालकाने मदतीचा हातभार दयावा नाहीतर आम्हाला राहते घर विकन्या शिवाय पर्याय नाही. अशी आपबीती तिने सांगितली.
यां प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहॆ.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!