मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेतून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच खरी राजकीय कमाई माजी आमदार अमर काळे.. कार्यकर्ता संवाद बैठकीच्या निमित्ताने प्रतिपादन..
गजेंद्र डोंगरे वर्धा /महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील उमेदवार अमर काळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ”कार्यकर्ता संवाद बैठक”आयोजन दिनांक ०५ एप्रिल रोजी श्रद्धा मंगलम पेठ अहमदपूर आष्टी येथे आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी काँग्रेसचे नगराध्यक्ष अनिल धोत्रे न.प. आष्टी, ईश्वर वरकड, चंद्रशेखर जोरे, प्रा. अरुण बाजारे, सो. शालिनी कोडापे, उत्तमराव गाडगे, दिलीप राठी, दिलीप निंभोरकर, दिलीप पवार, सौ. बेबी बिजवे, राजेंद्र मदनकर, रवींद्र गंजीवाले, शिवसेनेचे नानकसिंग बावरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळ मरसकोल्हे, शुभम नागपुरे, आशिष गावंडे, ईश्वर गुल्हाने, रेवा शंकर वाघ आदींची उपस्थिती होती.या बैठकीला मार्गदर्शन करताना अमर काळे म्हणाले की, सध्याचे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित आयोगानुसार हमीभाव, बेसुमार बेरोजगारी, वाढती महागाई आदी समस्या निराकरण करण्यासाठी असमर्थ ठरत आहे अशी खंत व्यक्त केली.यापुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग आधी स्वास्थ्य संस्थेवर दबाव तंत्राचा वापर करून लोकशाहीची क्रूर थट्टा करीत आहे.सध्याचे राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्यामुळे आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवावा असे आव्हान मतदारांना केले. भारतीय संविधान वाचविण्यासाठी व सध्या देशातील परिस्थिती लक्षात घेता देशातील हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची ही देशा करीता चिंतनीय बाब आहे. अशी खंत व्यक्त केली.मतदार संघातील सर्वच घटक पक्षाकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच खरी राजकीय कमाई असल्याचे ते पुढे म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अरुण बाजारे, तर संचालन जितेंद्र शेटे यांनी केले.या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता.