🔥दुचाकी ला वाचवण्याच्या नादात झाला अपघात,दैव बलोत्तर तर म्हणून दुचाकी स्वार बाल बाल बचावले.🔥दुचाकी चालकानेच बसचा काच फोडून सतर्कता दाखवून प्रवाशांना बाहेर काढले.
आष्टी शहीद /वरुड आष्टी तळेगाव या राष्ट्रीय महामार्गावर वरुड कडून आष्टीला येत असलेली वरुड आगाराची बस क्रमांक M H 40 य 5103 ही बस 45 प्रवासी घेऊन जात असताना धाडी घाट चढत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात बस मागे सरत जाग्यावरच पलटी झाली.या भीषण अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला मात्र दुचाकी स्वार दुचाकी स्वराने उडी घेतल्याने यातून ते दोघेही सुखरूप बचावले मात्र त्यांना किरकोळ इजा झाली.बस मध्ये असलेल्या 45 प्रवासा पैकी सात प्रवासी गंभीर जखमी झाले तर 32 प्रवासी किरकोळ जखमी असून यामध्ये महिला चालक किर्ती बोंदरे, वाहक सचिन काळे यांचा यात समावेश आहे.सदर घटना दिनांक 8 एप्रिल 2024 ला दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर असे की दि.8 एप्रिल रोजी वरुड वरून तळेगाव येथे जाण्यासाठी निघालेली वरुड आगाराची बस राजुरा, वाडेगव, हातुर्णा, साहूर ,धाडी, येथून प्रवासी घेत आष्टीच्या दिशेने येत असताना धाडी घाटात समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक M H 32 AG8244 यावर स्वार असलेले श्रीराम सोनवणे वय 48, व निकिता चौधरी वय 23 राहणार पंचाळा तालुका आष्टी जिल्हा वर्धा चालू आहे हे धाडीच्या दिशेने जात असताना दुचाकीला वाचवण्याच्या नादात प्रवासी घेऊन येत असलेली बस ला भीषण अपघात झाला या अपघातात बस मागे सरकत गेल्याने बस पलटी झाली.यात दुचाकीचा चंदामेंदा झाला असला तरी दुचाकी वरील दोघेही देव बलोत्तर असल्याने बाल बाल बचावले याच दुचाकी स्वरांनी बस मधील अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी आष्टी शहरासह धाडी परिसरात पोहोचतात पोलीस प्रशासनाला याबाबत तात्काळ माहिती देण्यात आल्याने रुग्णसेवा तात्काळ उपलब्ध झाल्याने जखमींना आष्टी ग्रामीण रुग्णालयात तात्काळ आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला.
यामध्ये सात गंभीर जखमींना अमरावती येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले तर 32 किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करण्यात आला. वरुड आगाराची बस वरील चालक महिला किर्ती बोंदरे तर वाहक सचिन काळे किरकोळ जखमी आहे.या जखमींवर आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर योगेश्वरी मसराम, डॉक्टर सृष्टी नगराळे, डॉक्टर निलेश निचत, डॉक्टर सिद्धार्थ उपाध्याय, डॉक्टर आशिष निचत, डॉक्टर भागवत राऊत, डॉक्टर रुपेश ठाकरे, डॉक्टर रोशन वानखडे, डॉक्टर अयफाज शेख, डॉक्टर पूर्वा दारोकार, यांच्यासह टीमने तात्काळ जखमींवर उपचार केले.तसेच पोलीस प्रशासनाला माहिती मिळतात त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली या तळेगावचे ठाणेदार प्रभारी आष्टी संदीप ढोबे, पोलीस उपनिरीक्षक पळणाटे, पोलीस कर्मचारी निलेश वाघमारे, मनोज असोले, बालाजी मस्के ,राहुल अमोने ,गजानन बावणे, आष्टी पोस्टचे राजेश पाटील,अमित जुवारे ,गजानन वडनेरकर, अश्विन ढाले ,विष्णू काळुसे नंदकिशोर वाळवे, करिष्मा परचाके, सहकार्य करून अपघाताची नोंद घेतली.पुढील तपास आष्टी पोलीस स्टेशन करीत आहे.