अखंड हिंदुराष्ट्र व मनसुवर्ण सिंहासन स्थापनेसाठी कर्नाटकमधील बेळगावचा तरुण निघाला अयोध्येला…

0

🔥सेलडोह येथे शिवसेनेच्या वतीने युवकाच जंगी स्वागत.      🔥१७०० किलोमीटरचा करणार सायकलने प्रवास.

सिंदी (रेल्वे) / रायगडावर पूर्णसंस्थापन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ मनसुवर्ण सिंहासनासाठी अखंड हिंदुराष्ट्राची संकल्पना घेऊन कर्नाटकातील बेळगाव येथील किशन टक्केवार हा तरुण १७०० किलोमीटरचा प्रवास करून सायकलने श्री. राम प्रभू चरणी साकडे घालण्यासाठी अयोध्येला निघाला आहे. दरम्यान, रविवारी हा युवक सेलडोह येथे पोहचला. यावेळी शिवसेना शाखा सेलडोह शाखाप्रमुख कान्हा धोंगडे यांच्या नेतृत्वाखाली गावात या तरुणाचे जंगी स्वागत करून मोठ्या उत्साहात अयोध्येला रवाना करण्यात आले.
अखंड हिंदुराष्ट्र तसेच रायगडावर लोकवर्गणीतून ३२ मनसुवर्ण सिंहासन स्थापन करण्याचा संकल्प घेऊन कर्नाटक मधील बेळगाव राहणार येळ्ळूर येथील रहिवाशी किशन टक्केवार वय २० वर्ष या तरुणाने दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी बेळगाव येथून सायकलने प्रारंभ केला. दरम्यान ७ दिवस ८०० किलोमीटरचा प्रवास करून रविवारी सेलडोह या गावात पोहचला. दरम्यान, गावातील अमोल सोनटक्के यांना हा तरुण दिसला. सोनटक्के यांनी या सायकलस्वार तरुणाला विचारणा केली असता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता असून रायगडावर लोकवर्गणीतून पूर्णसंस्थापन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ मनसुवर्ण सिंहासन स्थापना तसेच अखंड हिंदुराष्ट्राची संकल्पना घेऊन अयोध्येला श्री. रामचंद्राला साकडे घालण्यासाठी १७०० किलोमीटरचा प्रवास करून १६ एप्रिल रोजी जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तुमच्या सेलडोह गावात मला रात्रभर आश्रय पाहिजे आहे, अशी मागणी शिवभक्त किशन टक्केवार याने केली. ही माहिती सोनटक्के यांनी तात्काळ उ.बा.ठा. शिवसेना शाखा सेलडोहचे शाखाप्रमुख कान्हा धोंगडे यांना दिली. त्यामुळे धोंगडे यांनी लागलीच स्थानिक राजमाता क्रीडा मैदानावरील राजमाता अभ्यासिकामध्ये आश्रय देऊन त्या युवकाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली.
सोमवारी सकाळी उ.ब.ठा. शिवसेना शाखा सेलडोहचे शाखाप्रमुख कान्हा धोंगडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शाखाप्रमुख अभय चांदेकर यांनी या शिवभक्त तसेच शिवसैनिकाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जय श्री. रामाच्या घोषणा देऊन या तरुणाला अयोध्येसाठी नागपूरकडे रवाना केले. यावेळी राजीव बोटरे, कुणाल राऊत, सागर डाफे, धीरज लाडिस्कर, जितू मेहुणे, अभिलाष बोरले, पियुष दांडेकर, शुभम लांजेवार, सूरज हरभरे, सुमित सोनटक्के, सागर इरपाते, पुष्पराज मेश्राम, रोहित कुसराम, संदेश नागोसे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

🔥दिनेश घोडमारे साहसिक न्यूज /24 सिंदी रेल्वे🔥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!