वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी मेळावा…

0

हिंगणघाट / वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील कटारिया भवन येथे महाविकास आघाडीचे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे शहरात कारंजा चौक येथे आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले.तसेच कारंजा चौक ते कार्यक्रम स्थळ कटारिया भवन पर्यंत भव्य रॅली काढत जंगी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाने, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार राजू तिमांडे,प्रदेश उपाध्यक्ष किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सभापती सुधीर कोठारी,जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख,प्रवक्ते प्रवीण कुंटे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, समीर देशमुख, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू खूपसरे,आपचे नेते अनिल जवादे, आफताब खान, सैनिकदलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक बकाने, अल्पसंख्याकचे जावेद मिर्झा, प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, वाहतूक वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यातील सर्व सामान्य नागरिक महागाई व बेरोजगारीने होळपडून गेला आहे.तसेच देशांत हुकूमशाही व दडपशाही संपविण्यासाठी इंडिया अलायन्स (महविकास आघाडी) चे अधिकृत उमेदवार अमर काळे यांच्या तुतारी तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!