जि.प.शाळा,साटोडा येथे शाळापूर्व तयारी मेळावा सम्पन्न….

0

वर्धा / जि.प.उच्च प्राथमिक शाळा,साटोडा येथे प्रथम शाळापूर्व मेळाव्याचे आयोजन केले होते.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र पावडे,प्रमुख अतिथी मा.जया परमार(शिक्षण विस्तार अधिकारी),अजय बडे(शाळा व्यवस्थापन समिती,सदस्य),प्रशांत भाले, अरुणा हजारे,नितेश आडे,मंजिरी डुकरे,रंजना चहारे व पालक तथा वर्ग १ चे दाखल पात्र विद्यार्थी हजर होते.तसेच त्यावेळी प्रारंभी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली,घोषवाक्य विशेष आकर्षण ठरले त्यानंतर अजय बडे यांनी फित कापून मेळाव्याचे उदघाटन केले,मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,प्रस्ताविकेतून रवींद्र पावडे यांनी मेळावा का व कशासाठी हे विशद केले व जि.प.शाळेतच पालकांनी आपल्या पाल्याला दाखल करावे असे आवाहन केले.जया परमार मॅडम यांनी यथोचित मार्गदर्शन केले,अजय बडे यांनी कान्व्हेंट पेक्षा जि.प.च्या शाळा सरस असल्याचे सांगितले.तसेच ९ स्टॉल ची निर्मिती करण्यात आली होती दाखल पात्र विद्याथ्यांची क्षमता तपासण्यात आली.स्वयंसेवक म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी काम पाहलें, रांगोळी विशेष आकर्षण ठरले मंजिरी डुकरे व विद्याथिनींनी रेखाटन केले होते.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मंजिरी डुकरे,आभार नितेश आडे व समुपदेशन व साहित्य वाटप अरुणा हजारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 सेलू वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!