देव तारी त्याला कोण मारी याची आज प्रत्यक्षात आली पोरगव्हाण येथे प्रचिती.
आष्टी (शहीद)-/ येथुन नजीकच असलेल्या पोरगव्हाण येथील शेतकरी प्रविण श्रीनिवास केचे यांच्या शेतात आज सकाळी ६ ते २ या वेळेत आष्टी येथील १३ आणि पोरगव्हाण येथील ४ अशा एकुण १७ महीला निंदन करायला होत्या. आणि शेत मालका सोबत २ पुरूष मजुर पुंजाने उचलने करीता होते.सकाळी ९.४५ वाजताचे दरम्यान चिरचिर पाऊस चालु असताना अचानक प्रविण श्रीनिवास केचे यांच्या शेतापासुन १०० मीटर अंतरावर लहान आर्वी पायवाट रस्त्यावरील बिहाडा आणि पळस झाडावर जोरात वीज कडाडून खाली पडली.वीज पडलेल्या ठीकाणाचे अंतर थोड लांब असल्याने सर्व मजुरांना थोडक्यात शाॅक जाणवला. अन्यथा जीवीत हानी होऊन मोठा अनर्था घडला असता.शेतमालक प्रविण श्रीनिवास केचे हे सोबत असल्याने त्यांनी सर्व महीलांना सांभाळत स्वतःचे घरी सोबत आणले.आणि धीर देण्याचा प्रयत्न केला.सर्व मजुर थोडक्यात बचावले असल्याने “देव तारी त्याला कोण मारी” याची प्रचिती आज पोरगव्हाण येथे प्रत्यक्षात दिसून आली.