देवळी -/देवळी येथेअभियंता जनार्दन तुळशीराम ढोक वय ६७ वर्ष (रा. पोलीस स्टेशन चौक,देवळी) यांचे आज सोमवारला २६ आगस्ट रोजी सकाळी अल्प आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.दिवंगत ढोक यांनी श्री क्षेत्र अमरनाथची पायदळ यात्रा केली आहे. येथील अमरनाथ सेवा समितीचे अध्यक्ष तसेच नवदुर्गा देवस्थान चे संस्थापक सचिव आहे.स्थानिक मोक्षधाम येथे त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.माजी खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.