28 डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे ठाणे येथे राज्यस्तरीय 16 वे अधिवेशन
प्रतिनिधी / बीड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला मराठवाड्यातील सर्वाधिक पत्रकारांनी आपला सहभाग मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे नोंदवावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी होणार आहे. यावर्षीचे 16 वे अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभाग्रहात शानदार स्वरूपात होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला नामवंत पत्रकार उपस्थित राहणार असून मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणाऱ्या पत्रकार संघाच्या सभासदांना पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे विविध साहित्य प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अधिवेशन स्थळी देण्यात येणार आहे. या अधिवेशनाला मराठवाड्यातील सर्वाधिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, सभासद यांच्यासह मराठवाड्यातील सर्व पत्रकार बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे. सदरील अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांनी 22 डिसेंबर पर्यंत आपल्या नावाची नोंदणी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्याकडे करावी. अधिक माहितीसाठी 98 22 62 85 21 या नंबर वर संपर्क साधावा अथवा व्हाट्सअप वर मेसेज करावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव विवेक स्वामी यांनी केले आहे.