ग्रामपंचायत ची परवानगी नं घेताच सुरु आहे. बहान एज्युकेशन व सोशल टीम नागपूर द्वारा संचालित मॉन्टपोर्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संशयाच्या भोवऱ्यात महाविद्यालययाचे बांधकाम….. 

0

🔥हिच ती इमारत ग्रामपंचायत ची परवानगी नं घेताच सुरु आहे.
बहान एज्युकेशन व सोशल टीम नागपूर द्वारा संचालित मॉन्टपोर्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संशयाच्या भोवऱ्यात महाविद्यालययाचे बांधकाम.🔥२० उच्चशिक्षित शिक्षक ऐवजी केवळ ४ शिक्षित शिक्षक शिकवतात,ग्रामपंचायत चा इमारत कर थकीत, रस्त्यावर होते वाहणाची पार्किंग

आष्टी शहीद -/ आष्टी ते परसोडा मार्गांवर असलेल्या पेठ अहमदपूर ग्रामपंचायत च्या हद्दीत कोणत्याही नावाचा उल्लेख नसलेल्या एका महाविद्यालययाचे भव्य इमारतीचे बांधकाम ग्रामपंचायत ची परवानगी नं घेताच सुरु असल्याचा धक्ककादायक प्रकार समोर आला आहे.
सविस्तर असे की,
आष्टी ते परसोडा मार्गांवर पेठअहमदपूर ग्रामपंचायत च्या हद्दीत कोणत्याही नावाचा दर्शनी भागावर फलक नसलेल्या फार्मसी महाविद्यालययात गेल्या दोन वर्षांपासून अवैध इमारत बांधकाम सुरु आहे. पेठ अहमदपूर ग्रामपंचायत ने रीतसर मागणीपत्र देऊन थकीत इमारती कराची मागणी वेळोवेळी केली मात्र येथील महाविद्यालय ने इमारत कर थकवून 3लाख 15हजार रुपये थकविले आहे. पेठ अहमदपूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मेंढे यांनी महाविद्यालययांनी ग्रामपंचायत च्या जागेवर कब्जा करून वाल कंपाउंड चे बांधकाम करीत असल्याची तक्रार ग्रामपंचायत ला केली होती. त्या तक्रारी वर ग्रामपंचायत ने या महाविद्यालय याच्या संबंधताना पत्र पाठवून अवैध बांधकाम थांबविण्यास सांगितले होते. ग्रामपंचायत च्या नियमांना धाब्यावर बसवून इमारत कर गेल्या कित्येक वर्षांपासून थकवून त्या थकीत बिलाची रक्कम 3लाख 15 हजार रुपयापर्यत गेली. वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा इमारत कर भरला नाही. परवानगी नं घेताच इमारत बांधकाम व ग्रामपंचायत च्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले. या महाविद्यालय याच्या जागेत पार्किंग सुविधा नसून विध्यार्थी यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. उल्लेखनीय आहे की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या जागेला लागून शौचालय गुरु आहे शौचालय ची दुर्गंध मुळे या ठिकाणी पाणी पिणे सुद्धा शक्य नाही.गावात जाणाऱ्या विधुत वाहिनीचे विधुत खांब ही कंपाउंड च्या घेतले आहे.काही वर्षांपूर्वी येथे मोन्ट फोर्ट कॅन्व्हेंट सुरु झाले होते तेव्हा पोलिसांना येथील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विद्यालयात डी फॉर्म असे फार्मसी डिप्लोमा डिग्री कोर्सेस आहे या करिता कमीत कमी शिक्षक असणे आवश्यक आहे परंतु संचालकांनी एकही उच्चशिक्षित शिक्षकाची भरती केलेली नाही नाम मात्र कागदपत्रावर उच्चशिक्षित दाखवून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सध्या स्तितीत काही विध्यार्थी यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड देऊन मानसिक त्रास दिल्या जात असल्याचे काही विध्यार्थी यांनी नावं नं सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. या संस्थेत मुलींना शिक्षण मोफत ही योजना मान्य नाही शासनाने संस्थेला अनुदान न दिल्यामुळे मुलींना वारंवार ही मागण्यात येते व त्यांना मानसिक त्रास देण्यात येत आहे.सध्या या महाविद्यालय यात इमारतीचे बांधकाम जोरात सुरु असून या महाविद्यालय यात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी यांचा जीव टांगणीला लागला आहे. मोठी दुर्घटना झाल्यावर जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत ने कर वसुली साठी कंबर कसली असून या इमारतीच्या मालकावर काय कार्यवाही होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष पुरविणे काळाची गरज आहे.

नरेश भार्गव साहसिक News-/24 आष्टी शहीद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!