Breaking: चेकपोस्टवर तीन तासापासून पथकाकडून चौकशी सुरू

0

Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर / पंकज तायडे:
पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवरील अवैध वसुलीच्या व टन काट्यातही झाल्या बाबत आमदार एकनाथ खडसेंनी आरोप करत धक्कादायक प्रकार समोर आणल्यानंतर गेल्या ३ ते ४ तासापासून पथकाकडून चौकशी केली जात आहे.
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी ठेट विधानपरिषदेत पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवर प्रति वाहन २ हजारो रुपयाची वसुली केली जात असून दिवसाला १० ते १२ लाख रुपयांची माया गोळा केली असल्याची माहिती आ. एकनाथ खडसेंनी दिली होती वजन काट्यातही मोठी तफावत आढळून आली असल्याचे त्यांनी पेन ड्राईव्ह दिले होते या अवैध वसुलीमध्ये वर पासून साटेलोटे असल्याचे सांगत उद्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी खडसेंनी केली होती यामुळे गेल्या ३ ते ४ तासापासून पथकाकडून केली जात आहे. चौक पूर्णाड चेकपोस्ट वरती सर्रास पणे अवैध गुरांची व ओव्हरलोड वाहतूक होत असून आर्थिक चिरीमिरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. यात आर टी ओ शी साडेलोटे असल्यानेच हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!