🔥आईच्या आठवणीच पुढे जाण्याची ताकद देतात : खासदार अमर काळे
🔥स्व. प्रभावती भाऊराव चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण
वर्धा -/ आईच्या निधनामुळे माणसाच्या मनात असह्य, न भरून निघणारी पोकळी व मानसिक वेदना निर्माण होतात. या वेदना शारीरिक जखमेपेक्षाही खोल असते. जिथे जगात आपलेपणाने आधार देणारी एकमेव व्यक्ती हरवल्याची भावना माणसाला निराश करून टाकते. आईच्या जाण्याने आयुष्यात असा शून्य निर्माण होतो जो कधीही भरून येत नाही.
ही वेदना काळानुसार कमी होत नाही, तर माणूस त्या वेदने सोबत जगायला शिकतो. आईच्या आठवणीच पुढे जाण्याची ताकद देतात अशी भावना वर्धेचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली. ते 22 ऑगस्ट रोजी अनुसया सेलिब्रेशन हॉल येथे नामवंत वकील स्वर्गीय बी. जी. चौधरी यांच्या धर्मपत्नी व पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण बी. चौधरी यांच्या मातोश्री श्रीमती प्रभावती भाऊराव चौधरी यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत होते.
याप्रसंगी श्रद्धांजली सभेत महाराष्ट्रचे राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, माजी मंत्री अशोक शिंदे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, महाराष्ट्र मानव अधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायाधीश सी. एल. थूल, माजी आमदार सुभाष धोटे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री, काँग्रेस नेते शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, इंद्रकुमार सराफ, अनंत साळवे, सुनील कोल्हे, बाळा माऊसकर, ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही, प्रा. किरण उरकांदे डॉ. शिरीष गोडे, राजू लबाने, अनिल चौधरी, सुनील चौधरी, सौरभ चौधरी, माधुरी माटे, प्रशांत चौधरी, नागपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट अभय साबळे, एडवोकेट गुरु मुग्ध मुकेवार, डॉ. सुनिता धांडे, डॉ. प्रदीप धांडे, डॉ राम, डॉ. भानुदास अखूज, एडवोकेट टावरी, मिलिंद हांडे, एडवोकेट अनिल तिवारी, दिनेश शर्मा आदी अनेक मान्यवर वकील मंडळी उपस्थित होते. सभेचे संचालन एडवोकेट प्राजक्ता सौरभ चौधरी यांनी केले.