🔥आर्णी नगरपरिषदेचा भोंगळ कारभार,दोन घंटागाड्या तीन वर्षापासून धूळ खात.
🔥आर्णी नगरपरिषदेमध्ये जवळपास कर्मचारीच नगरपरिषदेचा कारभार चालवित आहे.
आर्णी -/ 2026 च्या नगरपरिषद निवडणूक मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सडो कि पडो वातावरण निर्माण झालेले आहे कचरा टेंडर संबंधी खूप चर्चेचा विषय झालेला आहे.शहरात आरोग्य संबंधित अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे माहूर चौकातील देशी दारू दुकाना जवळील शाळेजवळ अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे परंतु नगर परिषदेने त्या बाबीवर तीळ मात्र लक्ष केंद्रित केले नाही
🔥वाहतूक
वाहतूक व्यवस्था अतिशय कोलमडलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर एमएसईबी पावर हाऊस पर्यंत वाहतूक व्यवस्था अतिशय खोलमडलेली आहे रस्त्याच्या दुकानासमोर ग्राहक आपली वाहन उभे करतात लहान गाड्या लावतात परंतु नगर परिषदेचे तसेच पोलीस प्रशासनाचे त्यावर कोणतेही लक्ष नाही
फूटपाथ वर असलेल्या फ्रुट वाले भाजीपाले वाली त्यांच्यापासून दररोज नगर परिषदेचे कर्मचारी वसुली करताना दिसतात परंतु वाहतुकीवर कोणतेही येणार नाही तसेच त्या लहान व्यवसायिकांना नियोजित जागा आतापर्यंत मिळालेली नाही अशा प्रकारे आरोग्य दृष्टी वाहतूक दृष्ट्या अतिशय बिकट परिस्थिती आर्णी शहरात निर्माण झालेली आहे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा न्यूनगंड अवस्थेत आहे तसेच बहुमत नसल्याने खुद्द नगरसेवकाचे काम त्या नगरपरिषद देत होत नसल्याने नगरसेवक का मध्ये सुद्धा नाराजीचे वातावरण पसरलेले आहे.