उत्कल श्री जगन्नाथ सेवा समिती तर्फे अखंड नाम संकीर्तनाचे आयोजन आज पासून….

0

🔥उत्कल श्री जगन्नाथ सेवा समिती तर्फे अखंड नाम संकीर्तनाचे आयोजन आज पासून.

हिंगणा -/ उत्कल श्री जगन्नाथ सेवा समिती, नागपूर यांच्या वतीने नागाबाबा मंदिर, दिनेश बालराज परिसर, राय टाऊन १, एम.आय.डी.सी. एरिया, हिंगणा रोड, नागपूर येथे
या अखंड नाम संकीर्तना मुळे विश्व शांती साठी आयोजित केला जातो. “हरे कृष्ण हरे राम” हा मंत्र विश्वात सर्वात श्रेष्ठ मंत्र मानला जातो. अखंड नाम संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय कार्यक्रम बुधवार, दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ५.०० वाजता सुरू होणार आहे. या पावन प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमांतर्गत मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कलश स्थापना त्यानंतर बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून अखंड नाम संकीर्तनास प्रारंभ होईल.

बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून रात्री ११.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अखंड नाम संकीर्तनाची सांगता गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नाम समापन व नगर कीर्तनाने होणार आहे.
कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी ८३२९६७७४१३, ९९७०२३९३४५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

गजानन ढाकुळकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!