गजेंद्र डोंगरे,वर्धा /कुटकी गावात मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी केली गेली.संभाजी ब्रिगेडचे ता. प्रवक्ते- मिलिंद ढेवले यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दीपप्रज्वलन केले. महिला सरपंच ज्योती सतिमेश्राम, ग्रामपंचायत सदस्य, पदमाताई शांतारामजी नगराळे आणि ग्रा.प.तंटामुक्ती अध्यक्ष- प्रशांत अरून वैद्य सह शंकुतला धाबर्डे व बचत गटाच्या महिला पदाधिकारी, इत्यादी महीला गाववासीने या स्री उध्दारक महामानवाला पुष्पहार अर्पण करून समस्त गाववासीयांच्या उपस्थित अभिवादन केले. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कोमल नगराळे व कार्यकर्ते यांच्याकडून सदर गावांमध्ये अल्पोपहार व मठठा भोजनदान करण्यात आला.