बाभुळगाव नगरपंचायत व कृष्णापूरमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; चमडीचोर व लुच्छा सतीश नालमवार आणि नगरसेवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

0

🔥हाच तो बाभुळगाव येथील चमडीचोर व लुच्चा सतीश नालमवार याने केला बाभुळगाव येथे कोट्यवधी रुपया चा भ्रष्टाचार

🔥बाभुळगाव नगरपंचायत व कृष्णापूरमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; चमडीचोर व लुच्छा सतीश नालमवार आणि नगरसेवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

🔥​आरोग्य व विकासकामांत गैरव्यवहार सतीश नालमवार टोळीवर कारवाईची मागणी; आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ल्याचाही आरोप

​​बाभुळगाव -/ बाभुळगाव नगरपंचायत आणि कृष्णापूर ग्रामपंचायतीत नाली बांधकाम व इतर विकासकामांच्या नावाखाली शासकीय निधीचा मोठा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरसेवक अनिकेत पोहेकर आणि कंत्राटदार चमडीचोर लुच्छा सतीश मालनवार यांनी संगनमत करून विकासकामे न करताच शासनाचा निधी लाटल्याचा थेट आरोप करत बाभुळगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा दावा करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तक्रार देऊनही स्थानिक पातळीवर कारवाईऐवजी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाकडून ग्रामीण व निमशहरी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, बाभुळगाव नगरपंचायत आणि परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये हा निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च न होता विशिष्ट कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने लाटला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, बाभुळगाव नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत नाल्यांचे बांधकाम, दुरुस्ती व इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिकेत पोहेकर आणि कंत्राटदार सतीश नालमवार यांनी विविध कामांचे कंत्राट मिळवून, प्रत्यक्षात कामे पूर्ण न करता अथवा थातुरमातूर कामे दाखवून बिले उचलल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. केवळ कागदोपत्री विकास दाखवून शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हीच पद्धत कृष्णापूर ग्रामपंचायतीमधील कामांमध्येही राबवून निधीची विल्हेवाट लावल्याचे म्हटले आहे. या कथित भ्रष्टाचाराची माहिती माहिती अधिकारांतर्गत मागवून गैरव्यवहार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कृष्णापूर येथील एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सतीश नालमवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित कार्यकर्त्याला अडवून बेदम मारहाण केली तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. विकासकामांची पोलखोल करणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी अशा प्रकारची गुंडगिरी सुरू असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, बाभुळगावच्या ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याऐवजी उलट तक्रारदारालाच दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या या संशयास्पद भूमिकेमुळे संतप्त झालेल्या तक्रारदारांनी अखेर अमरावती परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली आहे. या निवेदनात स्थानिक पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्याची आणि दोषींवर कडक कलमान्वये गुन्हे नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक निधीची लूट आणि माहिती मागवणाऱ्यांवर होणारे हल्ले यांमुळे बाभुळगाव तालुक्यात राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. सतीश नालमवार आणि संबंधित नगरसेवकाच्या आर्थिक व्यवहारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नगरविकास विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जर वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 ​​बाभुळगाव,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!