🔥बारभाई गणेश मंडळाच्या १२७ व्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्याचा जागर
🔥भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०५ नागरिकांनी घेतला लाभ
या शिबिरात रक्तदान, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी तपासणी तसेच फिजिओथेरपीसंदर्भातील तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अजय वाणे यांच्या माध्यमातून फिजिओथेरपीसंदर्भातील तपासणी करण्यात आली. नागरिकांसाठी सर्व तपासण्या पूर्णपणे निःशुल्क ठेवण्यात आल्या होत्या. तपासणीनंतर आवश्यक उपचार व पुढील वैद्यकीय काळजीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.१२७ वर्षांची धार्मिक-सामाजिक परंपरा जपत बारभाई गणेश मंडळाने यंदा आरोग्य जनजागृतीचा सामाजिक संदेश दिला. गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर तसेच बारभाई गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.