बेलोरा-अपरवर्धा धरण मार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

0

🔥बेलोरा-अपरवर्धा धरण मार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

आष्टी शहीद ता.प्रतिनिधी (नरेश भार्गव)

आष्टी तालुक्यातील बेलोरा ते अपरवर्धा धरण मार्गावरील बेलोरा शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बेलोरा शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेह बराच जुना असून पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. तसेच तीव्र उन्हामुळे मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाली होती.

प्राथमिक पाहणीत संबंधित व्यक्तीच्या अंगावरील कपड्यांवरून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अथवा भिक्षेकरी असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृतदेहाचा काही भाग जंगली जनावरांनी खाल्ल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे मृतदेहाचे धड व डोके वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे याच शिवारात तत्कालीन जिल्हा अधीक्षक नुरुल हसन यांच्या कार्यकाळात एक महिला व पुरुषाचे प्रेत सुद्धा मिळालेले होते परंतु त्या प्रकरणाचा शोध पोलिसांना आतापर्यंत काढता आलेला नाही. हे विशेष

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक जोशी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळीच पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्याचे नियोजन केले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!