ब्रेकींग : कोगटा दुकानावर वनविभगाचा छापा; वन्यजीवांचे अवशेष जप्त
Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर/ पंकज तायडे:
वन्यप्राण्यांची शिकार व तस्कारी प्रकरणी दाखल गुन्ह्यात भवानीपेठेतील कोगटा या दुकानावर वनविभागाने छापा टाकून कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वन्यप्राण्यांची शिकार व तस्कारी जळगाव शहरातून होत असल्याची गोपनिय माहिती उपवनसंरक्षक विवेक होशींग यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी भवानी पेठेतील मे. रामनाथ रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात छापा टाकला. या छाप्यात हताजोडी, रानमांजर रंगनी, सियारसिंगी, कासवपाठ, इंद्रजाल, नाग मणके, घुबळ नखे, समुद्रघोडा या वन्यजीवांचे अवशेष जप्त केले आहे. याप्रकरणी डॉ. अजय लक्ष्मीनाराण कोगटा (वय ५३) रा. जळगाव,चुनीलाल नंदलाल पवार (वय-३०) रा. खेडागाव तांडा. ता. एरंडोल आणि लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय – ५४) रा. जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली असून तिघांनी तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
सहाय्यक वनसंरक्षक सुदश्रन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडीत, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, वनपाल संदीप पाटील, वनपाल योगश दिक्षित, वनरक्षक उल्हास पाटील, प्रशांत सोनवणे, जितेंद्र चिंचोले, अजय रायसींग, संभाजी पाटील, चालक ज्ञानेश्वर पवार यांनी कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात करीत आहे.