🔥हेच ते रेल्वे कोळसा डम्पिंग याड मुळे सर्वत्र विषारी धुराचे साम्राज्य.🔥हेच ते शेत पिकावर व लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम,प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष,जनतेत रोष.
देवळी -/देवळी येथील रेल्वे स्थानकात दर महिन्याला 35 ते 40 मॅट्रिक टन कोळशाची डम्पिंग होत असल्याने याचा परिणाम रेल्वे स्थानक व रेल्वे स्थानक परिसरातील शेती पिके , शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहे. रेल्वे स्थानकाच्या डम्पिंग यार्ड परिसरामध्ये कोळसा खाली करताना व टिप्पर मध्ये जेसीपीच्या साह्याने लोड करताना मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाच्या विषारी काळ्या धुरामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्ष धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दाट , घातक धुरामुळे परिसरात अक्षरशः धुराच्या गर्दीत सापडला असून जवळच्या शेती पिकांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे शेतकरी सांगत आहे. कोळशाच्या धुराचे बारीक कण झाडांवर व पिकांवर पडत असल्यामुळे संपूर्ण झाडे, पिके का काळवलेली आहे 🔥धुरामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील तांत्रिक उपकरणावर परिणाम.
देवळी रेल्वे स्टेशन जवळ कोळसा डम्पिंग यार्ड अगदी जवळ असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघतो व रेल्वे स्टेशन परिसर व रेल्वे स्टेशन मधील इलेक्ट्रॉनिक उपकरना वर जमा होतो ,त्यामुळे यंत्रांची काम करण्याची क्षमता कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दररोज उपकरणावर साधणारा धूर बुलोर मशीनने काढल्या जात आहे. ,(धूळ साफ करण्याची मशीन)तसेच रेल्वे स्थानक पाण्याने धुण्याचे काम करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानकापासून बऱ्याच अंतरावर डम्पिंग यार्ड असावयास पाहिजे होता पण तो अतिशय जवळ असल्याकारणाने निघणाऱ्या धुरामुळे रेल्वे स्टेशन संपूर्णपणे काळवंडलेले आहे. हे सर्व रेल्वे प्रशासनाला दिसून सुद्धा सर्व अधिकारी चुप्पी साधून असल्याचे दिसून येत आहे. कोळशासाठी रेल्वे मालगाडीच्या फेऱ्या महिन्याला चार ते पाच वेळा होत असून प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाची आवक होत आहे. मोठ्या प्रमाणात कोळशाची आवक असल्यामुळे व्यागेंन मधून कोरसा खाली करणे व ट्रक मध्ये भरून औद्योगिक वसाहती मधल्या पावर प्लांट मध्ये पाठविण्याचे काम सतत सुरू राहत असल्याने या परिसरातील रस्त्याची चाळणी बनली आहे व त्यामुळे प्रदूषणाचा विषय महत्त्वाचा ठरत आहे. 🔥लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम.
या धुरामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून या परिसरातील शेतामध्ये शेत काम करण्याकरिता मजूर येत नाही कारण या धुळामुळे काम करणारे मजूर संपूर्ण काळवड ते व धुरामुळे श्वास घेणे त्रासदायक होतो ,देवळी शहरातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून या विषारी धुळामुळे खोकला, घशाचा आजार, छातीचे आजार आणि डोळ्यावर विपरीत परिणाम होत आहे असे शेतीत काम करणारे मजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांना येऊन सांगत आहे. त्यामुळे या धुरावर नियंत्रण करणे अतिशय तातडीचे उपाय करणे गरजेचे आहे.
🔥समस्येकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.
वर्धा ,नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू असून कळम पर्यंत पूर्ण झाले असून लवकरच नांदेड पर्यंत पूर्णतः होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर या मार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे गाड्या धावणार आहे त्यामुळे देवळी रेल्वे स्थानकावर प्रवाशाची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशाची वादळ पाहता रेल्वे स्थानकावर असलेले कोळसा डम्पिंग यार्ड हे प्रवासाच्या दृष्टिकोनातून अतिशय त्रासदायक ठरणार आहे .त्यामुळे हे डम्पिंग यार्ड रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर नेण्यात यावे आणि व्यागेंन मधून कोळसा खाली करताना व गाड्यांमध्ये भरताना पाण्याचा वापर करून निघणारा धूर थांबवणे अतिशय गरजेचे आहे या वर आतापासूनच रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन योग्य ते नियोजन करावे याची काळजी लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाने घ्यावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.(क्रमशः)