वणा नदी पात्रातुन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या सात आरोपी वर गुन्हा दाखल,समुद्रपुर पोलीसाची कारवाई,…..

0

हिंगणघाट,समुद्रपुर,-/ मौजा वाकसुर शिवारातील वणा नदी पत्रातुन अवैध रित्या जे.सी.बी. च्या साहाय्याने ट्रक्ट मध्ये काळी रेती भरून चोरून वाहतुक करणाऱ्या 7 आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करून जु. कि. 51,50,000 रू मुद्देमाल जप्त करण्यात आले, पो.स्टे. समुद्रपूर येथील डि.बी. पथकाची कामगिरी.हकिकत याप्रमाणे आहे की, दिनांक 02/06/2024 रोजी मा. पोलीस अधिक्षक नरुल हसन साहेब, यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा वाकसुर शिवारातील वणा नदीच्या पात्रातुन काही इसम हे जे.सी. बी. च्या साहय्याने ट्रॅक्ट मध्ये विनापास परवाना काळी रेती चोरून वाहतुक करीत आहेत. अशा गोपनीय खाबरीची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात वणा नदीच्या पात्रात जावुन पाहणी केली असता वणा नदीचे पात्रात जे.सी.बी. चे साहयाने अवैद्य रित्या वाळु उत्खनन करुन चोरी करतांना दिसले. त्याचे वर लपत छपत जावुन रेड केला असता अवैद्य वाळुची उत्खन्न करुन चोरी करणारे आरोपी प्रमुख आरोपी नामे 1) संदीप दिनानाथ सोनटक्के वय 40 वर्षे रा. सिन्धी रेल्वे 2) चंद्रशेखर प्रकाश काबळी वय 28 वर्षे रा. सिन्धी रेल्वे 3) जेसिबी चालक निलेश शंकरलाल भारव्दाज वय 30 वर्षे रा. सिन्धी 4) कपील श्राणजी वाघमारे वय 360 वर्षे रा. आष्टा ता.जि. नागपुर 5) सचिन माणीक पेरकुटे वय 30 वर्षे रा. बरबडी 8) गणेश अंकुश पेरकुटे वय 23 वर्षे रा. बरबडी 7) सुरज विष्णु वाघमारे वय 23 रा. सिन्धी रेल्वे याचे ताब्यातुन चार टॅक्टर व त्यांच्या टॉली मध्ये वाळुने भरलेले व एक जेसीबी व दोन मोटार सायकल, 5 मोबाईल असा एकुन 57,500,00, / रु लाख चा माल मिळुन आल्याने सदर आरोपीतां विरुध्द गुन्हा नोद करून तपासात घेतला.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. याचे निर्देशाप्रमाणे मा. स.पो.नि. एस.बी शेगावकर ठाणेदार पो. स्टे. समुद्रपूर याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि. बि. पथक प्रमुख पोलीस नाईक प्रमोद थुल, सचिन भारशंकर, राजेश शेंडे, पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, समिर कुरेशी, स.फौ. गगांधर भोकरे यांनी केली.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!