गजेंद्र डोंगरे,वर्धा / सिंधी मेघे स्मशानभूमी लगत पवित्र धाम टेकडीवर वृक्ष सेवा समिती तर्फे ७०० झाडांची लागवड करण्यात आली असून प्रत्येक रविवारी श्रमदान शिबिराचे आयोजन करून वृक्ष सांगोपणाचे कार्य मागील 5 वर्षा पासून अविरत सुरु आहे.वृक्ष लागवड करणे जेवढे महत्वाचे आहे त्या पेक्षा जास्त वृक्ष संगोपनाची गरज असून हा विषय निव्वळ पर्यावरण समतोलचा भाग असण्यापुरता मर्यादित नसून वृक्ष संगोपणाचे कार्य हे माणसाच्या मनावर संस्कार घटवण्याचे कार्य नकळत पणे होत असते. ज्या परिवारानी या कार्यात आपला सहभाग दिला त्यां परिवाराची सर्व बाजूने प्रगती होते हा अनुभव वृक्ष सेवा समिती अनेक सदस्य अनुभवतायत.वृक्ष संगोपणासाठी प्रत्येक वर्धेकर परिवाराला आपला या सेवेत सहभाग देता यावा म्हणून पेपर रद्दी दान करून वृक्ष संगोपनाच्या कार्यात आपला खारीचा वाटा देता यावा म्हणून आम्ही पेपर रद्दी संकलन उपक्रमाचे यशस्वी आयोजन करीत आहो. या कार्यात अनेक परिवार पेपर रद्दी दान करून आम्हाला श्रमदानंसाठी प्रोत्साहित करीत आहे. तरी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग मिळाल्यास वृक्ष रोपण व संगोपणाचे कार्य मोठ्या प्रमाणात करता येईल असा विश्वास वृक्ष सेवा समितीचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी यावेळी व्यक्त केला.या शिबिराचे समन्व्ययक अशोक भिवगडे सचिव रवींद्र नागपूरकर यांनी नियोजन केले. तसेच यावेळी श्रमदानंला प्रदीप मेंढे, राहुल गोल्हर, विजय गावंडे, मंगेश भोंगाडे, अविनाश बुरडकर, विठ्ठल वंजारी, विशाल खंगन, हेमंत माध्यसवार, किशोर बाहे,पप्पू डांगट,मोहनीश पोतद्दार, राम उंबरकर,धम्मिक शंभरकर, बाबाराव आगलावे, धीरज चौव्हाण,श्यामभाऊ परसोडकर, रोहित कचवा, शुभम सातपुते यांनी श्रमदान शिबिरात सातत्याने सहभाग दिला..