🔥श्री सत्य साईं रथ यात्रेचे जिल्ह्याच्या सिमेवर उत्स्फूर्त स्वागत
(प्रतीनीधी,राजू वाटाणे)
भिडी -/ श्री सत्य साईं बाबा प्रेम प्रवाहिनी रथ यात्रेचे जिल्ह्याच्या सिमेवर साई भक्ताच्या उपस्थितीत जिल्हा साईं समिती व भिडी सत्यसाई सेवा समितीच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रवेश आगमनार्थ भव्य स्वागत करन्यात आले.
पूंटपूर्ती आंध्रप्रदेश येथून निघालेल्या सत्य साईं बाबा प्रेम प्रवाहिनी रथ यात्रा यवतमाळ वरून वर्धा जिल्हात शिरपूर (होरे)वर्धा नदी तिरावर जिल्हा प्रवेश करताच सत्य साईं समिती जिल्हा अध्यक्ष सूधिर अड्डे,भिडी सत्यसांई सेवा समिती सूरेश आलोडे,शंकर ठाकरे यांनी रथ यात्रेचे पूजण, आरती व रथ चालकांचे शाल ,श्रीफळ देवून व यवतमाळ जिल्हा साईं समिती अध्यक्ष गजानन अलगूडवार यांचे स्वागत करन्यात आले यावेळी उपस्थीत साईं भक्तांनी साईं चरण दर्शन घेतले व रथ यात्रा हूसनापूर,वाबगाव,गणेश- पूर , सैदापूर,बाभूळगाव मार्गे भिडी येथे सायंकाळी ६ वाजता साईभजणी,रथ मिरवनूक व महाप्रसादाचे आयोजन ठरविण्यात आले या वेळी मोठ्या संखेने साईं भंक्त उपस्थित होते.