सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन गटांचा ‘तुफान राडा’

0

🔥सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन गटांचा ‘तुफान राडा’🔥भाजपा शहराध्यक्षासह दोन्ही गटांतील आरोपींना बेड्या.

🔥पोलिसांचा कडक कारवाईचा बडगा.

🔥एकावर सावंगीच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया.

सिंदी (रेल्वे) -/ जुन्या वादातून दोन गटांमध्ये बुधवारी (२० मे २०२६) रात्री ८.०० ते ९.०० च्या सुमारास शहरातील चिचघाटपुरा परिसरात तुफान हाणामारी झाली. हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून पोलिसांनी सर्वांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या हाणामारीत सिंदी शहर भाजपाचे अध्यक्ष अमोल गवळी यांचे नाव समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

     नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास आकाश गवळी आणि अक्षय डफ हे दोघे दुचाकीवरून जात असताना, सागर दयाराम बाबरे याच्यासोबत जुन्या वैमनस्यातून त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन सागर बाबरे याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर सागरने त्याचे भाऊ सौरभ आणि तेजस बाबरे यांना बोलावून घेतले. यानंतर दोन्ही गटांत जोरदार संघर्ष झाला. या झटापटीत चाकूचा वापर झाल्याने अक्षय डफ गंभीर जखमी झाला, तर तेजस बाबरे याच्यावरही वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

     ही घटना ताजी असतानाच, दोन्ही गट तक्रार देण्यासाठी सिंदी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे पुन्हा एकदा दोन्ही गट आमनेसामने आल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच तुफान राडा झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ठाणेदार नरेंद्र निस्वादे आणि पोलीस उपनिरीक्षक ओम कलेगुरवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या राड्यामुळे रात्री पहाटे पर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती.

     यामध्ये पोलिसांनी फिर्यादी अक्षय डफ याच्य तक्रारीवरून सागर दयाराम बाबरे (२८), सौरभ दयाराम बाबरे (२५) आणि तेजस संजय बाबरे (१७ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.S. कलम ११८(१), १२६(२), २९६,११५(२), ३५२ आणि ३(५) न्सार गून्हा दाखल करून सागर आणि सौरभ यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे फिर्यादी सौरभ बाबरे याच्या तक्रारीवरून भाजपा शहराध्यक्ष अमोल गवळी (३६), आकाश गवळी (३४) आणि अक्षय डफ (३०) यांच्याविरुद्धही कलम ११८(१), ११५(२) आणि ३(५) नुसार गुन्ह नोंदवृन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे सध्या सिंदी परिसरात तणावपर्ण शांतता अस्न कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवन आहेत.

🔥एकावर रुग्णालयात शस्त्रक्रिया.

या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तेजस संजय बाबरे (१७) याला पुढील उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातावर गंभीर जखमा असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

🔥राजकीय वळण आणि कारवाई

अटकेत असलेला आरोपी अमोल गवळी हा सिंदी शहर भाजपा अध्यक्ष असून, त्यांची पत्नी प्रभाग ०७ मधील भाजपची विद्यमान नगरसेविका आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्याचे नाव या गंभीर प्रकरणात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

      ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 सिंदी रेल्वे,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!