सेलू येथे बुद्धभीमगीताने भीमसकाळ कार्यक्रम संपन्न.
सिंदी (रेल्वे) : जयभीम मित्रपरिवार तर्फे सेलू येथील विकास चौकात भल्या पहाटे भिमसकाळ कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा व अन्य महापुरुषाच्या पूजनाने सुरुवात झाली. कार्यक्रमाला सेलू तालुक्यातील असंख्य बंधू भगिनी तसेच अनेक तरुण तरुणी उपस्थित होते. त्यामुळे सकाळी संपूर्ण वातावरण आनंदमय झालं होतं. कार्यक्रमाच प्रमुख आकर्षण म्हणजे नागपूर व वर्धा येथील भीमसकाळची लहान मुले-मुली व तरुण-तरुणी होते. केळझर येथील टीमने आदिवासी गीतावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. शेवटी मुंबई येथील सूरज अतिष व संच यांनी कव्वाली सादर करून जनतेला मंत्रमुग्ध केले.विशेषतः कार्यक्रमामध्ये सेलू येथील बंधू जामनकर यांची कन्या अस्मिता जामनकर हिने आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही स्वतःची बुद्धिमत्ता कौशल्य दाखवून शिक्षणात इंग्लंडमधील लंडन येथे अर्थशास्त्रात एम.एस.सी. करण्यासाठी निवड झाली त्यामुळे तिचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सेलू येथील प्रज्वल लटारे यांनी केलेल्या सामाजिक कर्तुत्वाला प्रोत्साहन म्हणून सन्मानित करण्यात आले. सोबतच अन्य छोट्या मुलांमुलीचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सेलू येथील नालंदा बुद्ध विहार, नवचैत्यन्य बुद्ध विहार, सम्यक बुद्ध विहार व आनंद बुद्ध विहार घोराड येथील कार्यकर्यांनी पर्याप्त साथ सहयोग दिला. तालुक्यातील तरुण तरुणी तसेच सर्व बंधू भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन साक्षी दारुंडे यांनी केले तर आभार निखिल नंदेश्वर यांनी केले.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे