९ लाखांचा सिमेंट रस्ता फक्त ११४.५० मीटर; फलकावरील दाव्यांवर प्रश्नचिन्ह

0

🔥९ लाखांचा सिमेंट रस्ता फक्त ११४.५० मीटर; फलकावरील दाव्यांवर प्रश्नचिन्ह?🔥अखेर दै साहसिक ह्याच त्या बातमीचा दणका: दोन ते चार दिवसांत बॅनरवर ठेकेदाराचे नाव; ग्रामस्थांमध्ये संताप.

हिंगणघाट (प्रतिनिधी) -/ईकबाल पहेलवान 
तालुक्यातील काजळसरा ग्रामपंचायत अंतर्गत गट ग्रामपंचायत नरसाळा येथे सिमेंट रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सुमारे ९ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात केवळ ११४.५० मीटरपर्यंतच सिमेंट रस्ता करण्यात आल्याचे समोर आले आहे.
कामाच्या ठिकाणी लावलेल्या फलकावर “शमशानभूमीपर्यंत रस्ता” असे स्पष्ट नमूद असताना, प्रत्यक्ष पाहणीमध्ये उर्वरित रस्त्यावर मुरूम व गिट्टी टाकून काम पूर्ण केल्याचे दिसून आले. त्यामुळे फलकावरील माहिती आणि प्रत्यक्ष कामामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे संबंधित ठेकेदार “कलश कन्स्ट्रक्शन, नंदोरी” तसेच ग्रामपंचायत सचिव यांनीही सिमेंट रस्ता फक्त ११४.५० मीटरपर्यंतच झाल्याची कबुली दिली आहे. यामुळे या कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, ही बाब माध्यमांमध्ये उघड झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत कामाच्या ठिकाणी नव्याने बॅनर लावण्यात आला असून त्यावर ठेकेदाराचे नाव ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे ग्रामस्थांमध्ये अधिकच संशय निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शमशानभूमीपर्यंत रस्ता होणार असे दाखवून प्रत्यक्षात अर्धवट काम करण्यात आले. पावसाळ्यात या मुरूम रस्त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतील.”
या प्रकरणात निधीचा अपव्यय झाला का, तसेच मोजमाप पुस्तिकेनुसार (एम.बी.) काम पूर्ण झाले का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे।

🔥ग्रामस्थांचा सवाल
“ठेकेदार व सचिव दोघेही ११४.५० मीटरच काम झाल्याचे सांगत असताना, फलकावर ‘शमशानभूमीपर्यंत रस्ता’ असा दावा का करण्यात आला? नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर नाही ना?”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!