अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने घरातच पुरविला मुलीचा मृतदेह

0

प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्ध्यात आठ दिवसांपूर्वी स्वयंपाकघरात पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात सेवाग्राम पोलिसांना गुरुवारी यश आले. आजारी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने पत्नी व मुलांच्या मदतीने घरात मृतदेह पुरल्याची धक्कादायक कबुली वडील साहेबराव भस्मे याने दिली आहे.
सेवाग्रामच्या आदर्श नगर येथे साहेबराव भस्मे हे आपल्या परिवारासह राहत होते. त्यांच्या परिवारात साहेबराव ची पत्नी , मुलगा प्रशांत (३६), मुलगी प्रणिता (३८) असे चौघे राहत होते. प्रणिता हि मानसिक रुग्ण होती. त्यामुळे तिला नेहमी रुग्णालयात दाखल करा लागत होते. काही दिवसांपूर्वीच प्रणिताची प्रकृती खराब झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर तिला घरी आणले. परंतु दिनांक ४ जूलै रोजी प्रकूती अजानक खराब झाली आणि तिचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने वडील साहेबराव भस्मे व भाऊ प्रशांत, व आईने यांनी मिळून घरातच गड्डा करून मुतदेह पुरविला. परंतु शेजाऱ्यांना आठ दिवसांपासून प्रणीता बाहेर दिसली नसल्याने संशय आला.त्यामुळे हि माहिती शेजाऱ्यांनी सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी आज दिनांक १४ जूलै रोजी घटना स्थळी भेट देत विचारपूस केली असता सर्व प्रकार समोर आला. जमिनीत पुरवलेला मुतदेह बाहेर काढण्यासाठी न्याय दंडाधिकारी उपस्थित पाहिजे असल्याने तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, सेवाग्रामचे ठाणेदार चकाटे हे सर्व घटना स्थळी पोहचले. मुतदेह पुर्ण कुजलेला असल्याने सेवाग्राम येथील फॉरेन्सिकचे टीम सुद्धा घटनास्थळी बोलविण्यात आली सेवाग्राम येथील फॉरेन्सिकचे डॉक्टर प्रविण झोपाटे व त्यांची टीम ही सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेहाचा पंचनामा आणि शवविच्छेदन घटनास्थळीस पोलीस तसेच तहसीलदार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथील स्मशानभूमीत करण्यात आला आहे.
वृत्त लिहितोवर पोलीस स्टेशन येथे कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!