अभिनव भारत फाऊंडेशनचे अभिनव वाडी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न…..

0

वर्धा / १० एप्रिल रोजी अभिनव भारत फाउंडेशनचे गोंधळकर ले आऊट सेवाग्राम येथील अभिनव वाडी या पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला अभिनव भारत फाउंडेशनचे जिल्हा व तालुका सनमवयक महिला कर्मचारी यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले त्यानंतर अभिनव भारत फाऊंडेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग गो. वांदिले यांनी सदर प्रकल्पाबद्दल उपस्थित महिलांना सविस्तर माहिती दिली. वर्धा जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटील यांनी उपस्थित महिलांना अभिनव भारत फाउंडेशनचे येणारे आगामी प्रोजेक्ट आणि स्वयंसेविका भरती अभियान याबद्दल माहिती दिली. त्यानंतर नई तालीम बापू कुटी सेवाग्राम येथे संस्थेची मिटिंग पार पडली.यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वयंसेविकांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळे वर्धा जिल्ह्यातील हजारो महिलांना रोजगार मिळेल. सदर कार्यक्रमाला पुजा गिरडे, प्रिती वासनिक, विजया तेलरांधे, जयश्री फंदे ,दुर्गा बावणे, सुरेखा पंधरे, वर्षा बारई, जयश्री ढोंगे, प्रतिमा देशभ्रतार, दिपाली कौरती, आरती मुते, रेखा कावडकर, सूर्यकांत चव्हाण, राखी बोभाटे, सोनाली नाईक, शुभांगी बिडकर,आदींच्या प्रमुख उपस्थिती अभिनव भारत फाउंडेशनचे अभिनव वाडी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले.

चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 सेलू-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!