आष्टी शहीद / तालुक्यात दोन दिवस जात नाही तर पुन्हा पुन्हा अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचे शेतात असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की एप्रिल महिन्यात सतत अवकाळी व वादळी पाऊस येत असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातला घास हिरावून जात असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे.सध्या स्थिती त तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक तसेच संत्रा उत्पादक शेतकरी असल्याने या शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.कांदा पीक काढणीला आले असून काही शेतकऱ्याचे काढलेले कांद्याचे पीक खराब होत आहे तसेच असाच पाऊस सुरू राहिला तर पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे.तसेच अनेकांचे गहू शेतात उभे असताना काढणीला आलेला गव्हाचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे एवढा सारा अवकाळी पाऊस होऊनही शासनाकडून कोणत्याच प्रकारचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश नसल्याने याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शेतकरी अहवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीची पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.