आर्वी -/आजवर सजीवांना म्हणजे माणूस, प्राणी यांच्यावर रोगांच्या अथवा बिमारीच्या साथी आलेल्या बघितलेल्या अथवा अनुभवल्या असलाच. पण आर्वी शहरात एका अजबच बिमारीने निर्जीव गाड्या मध्ये थैमान मचवले आहे. दर दहा गाडी मालका पैकी सात, आठ गाडी मालकाच्या दु चाकी वाहन सद्ध्या एका अजबच बिमारीतून जात आहे.झाले असे की, आर्वी शहरात व आसपासच्या परीसरातील गाडी मालकांच्या गाड्या रस्त्यावर चालतांना अचानकच अॅक्सिलरेटर जाम होऊन वाढते आणि सोबतच गाडीची गतीही वाढते.अशातच गर्दीत असलेली गाडी नियंत्रित होत नाही. त्यामुळे अपघाताचा अनर्थ होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी मालकांना गाडी दुरुस्ती करीता गाडी मेकॅनिक गॅरेज गाठावे लागते.आर्वीत असलेल्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरत असतात. परंतु या काही दिवसात सदोष पेट्रोल, पेट्रोल पंपावर आले असावे त्यामुळे एकाचवेळी अचानक अनेक गाड्यांमधे असा प्रकार बघायला मिळत आहे. त्यावरुन गाडी मालक असा कयास लावत असुन पेट्रोल पंपावरील पेट्रोलची चाचपणी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मेकॅनिक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रोज दहा ते पंधरा गाड्यांच्या याच तक्रारी येत आहेत. परंतू जर खरच सदोष पेट्रोल मुळे असे होत असेल आणि शहरात अथवा महामार्गावर अचानक गाडी नियंत्रणा बाहेर जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच आजकाल महाग झालेल्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन गाडी निकामी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.