आष्टी तालुक्यात तीन दिवसापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या…

0

गारपिटीस झालेल्या पावसाने गहू, संत्रा मोसंबी, कांदा यासह इतर पिकांचे झाले नुकसान.

आष्टी शहीद / तालुक्यात दिनांक 9 एप्रिल ते 11एप्रिल दरम्यान तालुक्यात सर्व दूर वादळी वारा गारपीटी सह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास पडल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या अवकाळी वादळी पावसा मुळे शेतकऱ्याच्या शेतात उभे असलेले गव्हाचे पीक जमिनीवर झोपून गेले सोबतच संत्रा मोसंबी या पिकांचा वादळामुळे आंब्या बहर गडल्यानेप शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि ला आलेला कांदा पावसामुळे खराब झाला आहे अनेकांनी कांदा उकडून काढून जमिनीवर पडला असल्याने या कांद्याचे मोठे नुकसान आहे त्याच सोबत इतर पिकाचेही नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आष्टी तहसीलचे तहसीलदार यांनी झालेल्या पिकाची नुकसानीची सर्वेक्षण करून पाहणी करण्याचे आदेश महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले आहे.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!