उपमुख्यमंत्री फडणवीस,प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत रामदास तड़स दाखल करणार नामांकन अर्ज….

0

                  वर्धा / आज वर्धा लोकसभेकरिता महायुतीचे उमेदवार रामदास तडस आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस आणी प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुले यावेळी उपस्थीत राहणार आहे. स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिर येथून सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता पदयात्रा निघणार असून महायुतीतील भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई,रासप,लहुशक्ती तसेच अनेक पार्टीचे नेते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते माजीमंत्री सुबोध मोहिते,शिवसेनेचे माजी मंत्री अशोक शिंदे,आरपीआयचे विजय अगलावे, डॉ अनिल बोंडे,लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे, आमदार डॉ रामदास आंबटकर,आमदार,डॉ पंकज भोयर,आमदार समीर कुणावार,आमदार दादाराव केचे, आमदार प्रताप अड़सड,विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर,भाजपा प्रदेश सचिव सरिता गाखरे,जिल्हा भाजपा अध्यक्ष सुनील गफाट, देवळी विधानसभा प्रमुख राजेश बकाने,माजी आ.सुरेश वाघमारे,जिल्हा प्रमुख गणेश ईखार,राजू सराफ,राणा रणनवारे तसेच जिल्हयातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे, यात हजारोच्या संख्येत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, महायूतिच्या वतीने करण्यात आले आहे.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!