सिंदी (रेल्वे) /एम. ढोबळे इन्शुरन्स सिंदी( रेल्वे ) तर्फे बस स्टॉपचौक पालीवाल कॉम्प्लेक्सजवळ भीमजयंती निमित्य अल्पोपहार तसेच थंड पाणी, शितपेयाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहूमहाराज, श्री. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर बिरसामुंडा, मातारामाई यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे सुधाकर वाघमारे, कांताबाई ढोबळे, नेत्रा ढोबळे, ईश्वर कळसकर आणि मित्र मंडळी प्रणय धाबर्डे, संघात मसराम, रोहन गेडाम, सचिन काटोले, प्रफूफ कस्तुरे, वैभव ढोबळे, सुमित ढोबळे, राजू कुरेशी, अविनाश महाकाळकर, आशिष ढोबळे, प्रफुल गणवीर, प्रशांत कस्तुरे आदी उपिस्थत होते. सर्व बहुजन समाजातील जाणते कार्यकर्ते उपिस्थत होते व कार्यक्रमाची शोभा वाढवली.