वर्धा -/ खैरे कुणबी समाज, पश्चिम नागपूरच्या वतीने खैरे कुणबी समाज, पश्चिम नागपूर तर्फे दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळी हिंदी भाषा मोर भवन, नागपूर येथे दहावी व बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुभाषजी चौधरी, कुरुगुर रातुम नागपूर डॉ. तुकाराम धोबे, डी. के. आरीकर, निलेश महाजन, व कोहपरे, व ईतर मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थित दर्शविली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटन प्रमुख महादेव वैद्य, मोहन डंभारे, गिरीश कावळे, राजेश पिंपळे, रवि वैद्य, राजेंद्र महाजन, गिरिधर झोटींग, कमलाकर बोरकुटे, ज्ञानेश्वर शेंडे, विजय शिवणकर, योगेश कुतरमारे, महादेव मानकर, रमेश चौधरी, रामचंद्र भोयर, भोपे सर, राजेश जवादे अनुप रडके, दिगांबर शेंडे, पुणेकर, इतर समाज बांधवांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला उपस्थित काही समाज बांधावाचा सुद्धा सत्कार करण्यात आला. व कार्यक्रमाला १५०-२०० पेक्षा जास्त खैरे कुणबी समाज बांधवांनी सहभाग घेतला आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भावी यश व आयुष्यासाठी शुभकामना दिल्या.