घराच्या छतावरून पडून युवकाचा मृत्यू

0

प्रतिनिधी / वर्धा:

वर्धा तालुक्यातील पुलई येथील एका युवकाचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री सुमारास घडली.मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव गोलू सुरेश केंडे वय 32 वर्षे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार गोलू हा घरात गर्मी होत असल्याने रात्री झोपण्यासाठी घराच्या छतावर गेला मध्यरात्री त्याला लघुशंका लागल्याने तो उठला परंतु छताला पॅरापिट नसल्याने त्याचा पाय घसरला आणि खाली पडला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती खरागणा पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुलइ गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!