चक्क मोबाइलसाठी लावला तिने गळफास.

0

🔥शहरातील चीचघाट येथील                           घटना.

🔥पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद.

सिंदी (रेल्वे) : मोबाइल घेऊन देत नसल्याच्या कारणातून १५ वर्षिय अल्पवयीन मुलीने स्नानगृहात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शहरातील चिचघाटपूरा येथे घडली. श्रावणी रायभान मसराम असे मृत मुलीचे नाव आहे.
सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे मसराम कुटुंब रात्री जेवणासाठी बसले होते. जेवण झाल्यावर श्रावणीने आईला खर्रा खाण्यासाठी 20 रुपये दे, नाहीतर मोबाईल घेऊन दे, असे म्हणत मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावला. घरी पैसे नसल्याने नंतर मोबाईल घेऊ, असे तिच्या आईने श्रावणीस सांगितले. मात्र, श्रावणीने ऐकले नाही. मोबाईल घेऊन देण्यासाठी लावलेल्या तगाद्याने संतापलेली श्रावणीची आई तिच्यावर रागावली होती. परिणामी, रात्री दहा वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी गेली असता श्रावणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर वडिल लघुशंकेसाठी उठले असता आवाज देवूनही बाथरूमचे दार उघडत नसल्याने दाराचा कोंडा तोडून दार उघडले असता मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24 सिंदी रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!