छत्रपती सेने तर्फे बेसहारा नागरिकांना ब्लँकेट वाटप….

0

🔥छत्रपती सेने तर्फे बेसहारा नागरिकांना ब्लँकेट वाटप.
🔥पुढील काळात बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी संघटनेची – मंगेश चोरे(पाटील)

वर्धा -/ मावळत्या वर्षाला निरोप देत व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती सेनेच्या वतीने वर्धा शहरातील विविध भागांमध्ये थंडीत उघड्यावर झोपलेल्या गोरगरीब व बेसहारा नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. काल रात्री ९ ते १२ या वेळेत सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.छत्रपती सेना ही राजकारण विरहित सामाजिक संघटना असून प्रामाणिक समाजकार्याच्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांनी समान विचारधारेच्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन या संघटनेची स्थापना केली आहे. अल्पावधीतच संघटनेने जिल्हा व राज्यस्तरावर आपले जाळे विस्तारले असून शेकडो नागरिकांनी संघटनेत सहभाग नोंदविला आहे.संघटनेच्या वतीने भविष्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, शहरातील बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून सामाजिक दायित्व पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांनी दिली.

एकीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र पार्ट्या सुरू असताना छत्रपती सेनेने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. अनेकांनी संघटनेच्या या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले असून पुढील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आश्वासनही दिले आहे.संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रमेश चौधरी यांनी पुढील काळात बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी छत्रपती सेना स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्य पदाधिकारी दिलीप भुजाडे यांनी असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील असे सांगितले. यावेळी युवा वर्गाने मोठ्या संख्येने संघटनेत सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले.या उपक्रमाच्या वेळी संस्थापक अध्यक्ष मंगेश चोरे (पाटील), राज्य पदाधिकारी दिलीप भुजाडे, सूर्यप्रकाश पांडे, चंद्रकांत तीळले (पेंटर), संजय भाऊ तीळले (पेंटर), निस्ताने, छत्रपती सेनेचे शहर प्रमुख समीर अग्रवाल,आशिष सिंग, शिवसेनेचे उपशहर प्रमुख संतोष लांगोरे, प्रकाश डोडानी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!