जि प उच्च प्राथमिक शाळा, साटोडा येथे पर्यावरणपोषक दिवाळी संपन्न.

0

नालवाडी केंद्रातील साटोडा येथे विविध कार्यक्रम घेऊन नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली,यात रांगोळी स्पर्धा,ग्रीटिंग कार्ड स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशा सोनवानें ,सदस्य अजय बढे,मुख्याध्यापक रवींद्र पावडे,अरुणा हजारे, नितेश आडे,मंजिरी डुकरे,अंगणवाडी शिक्षिका रंजना चहारे, मदतनीस दीपाली ओरके व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी रवींद्र पावडे यांनी दिवाळी सणाचे महत्व विशद केले,फटाक्यांची आतषबाजी झाली कार्यक्रमाचे संचालन नितेश आडे यांनी तर आभार मंजिरी डुकरे यांनी मानले सर्वांना मिष्टांन भोजन देण्यात आले.

सागर झोरे साहसिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!