गणाचार्य श्री 108 विरागसागर जी महाराज यांच्या सानिध्यात पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव.
हिंगणघाट /हिंगणघाटच्या पावन भूमीवर प.पू. भारत गौरव, राष्ट्रसंत, गणाचार्य श्री 108 विरागसागर जी महाराज यांच्या सानिध्यात व श्रमणमुनी श्री विशेषसागर जी महाराज यांच्या प्रेरणेने चालु असलेल्या हिंगणघाट येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी “केवलज्ञान कल्याणक” ही सकाळी महामुनिराज तीर्थकर शांतीनाथ यांच्या ”आहार क्रिया विधि” चे एक अद्वितीय दृश्य दर्शविले गेले.
यानिमित्ताने सर्वप्रथम पू. गुरुदेवांचे पाय धुवून शास्त्र अर्पण करण्याचे सौभाग्य पुण्यशाली परिवार सुजाता समीर गडेकर व विकास जैन रायपूर कुटुंबांना प्राप्त केले. तसेच दुपारच्या वेळी पू. गुरुदेवांनी नवीन मूर्तींना सुरी मंत्र सांगून केवलज्ञान क्रिया केली आणि केवलज्ञानानंतर भव्य समवशरण तयार केले गेले जे चार प्रकारचे देव, चार प्रकारच्या देवी, मुनी, आर्यिका, श्रावक-श्राविका आणि तिर्यंच अशा 12 सभा असतात. ज्यामध्ये गणधर परमेष्ठी म्हणून विराजमान प.पू. गणाचार्य श्री द्वारा ॐकारमयी दिव्यदेशनाच्या माध्यमातून भक्तांची आणि जिज्ञासू लोकांची जिज्ञासा तृप्त करून ते म्हणाले की, या जगात केवळ सद्गुणी आत्मे आणि महान प्राणीच जिनेंद्र प्रभूंच्या पवित्र वचनांचा आनंद घेऊ शकतात. हा जीव अनादी काळापासून चतुर्गतीच्या रूपाने जगात फिरत आहे, याचे मुख्य कारण असत्य आहे आणि जोपर्यंत मिध्यात्वचा उदय कायम राहतो तोपर्यंत माणसाच्या मनात धर्माच्या गोष्टींमध्ये रुचि, श्रद्धा आणि आस्था निर्माण होत नाही, त्यामुळे माणूस सतत पापकर्म करून दुःखी राहतो, त्याच्या आयुष्यात सुख-शांती कधीच वाढणार नाही, मंदिरात जाण्याचा प्रश्नही उद्भवत नाही आणि जसे मिथ्यात्व कर्माचे सम्यक्त्व रूपांतर होताच, तसेच धर्मावरील श्रद्धेने प्राप्त झालेल्या ज्ञानही सम्यज्ञाात रूपांतर होताच मनुष्य स्वहिताकडे जागृत होतो.
कार्यक्रमानंतर रात्री बँडसह मिरवणूक काढण्यात आली. बी.एल. मोहता कंपाऊंड परिसरात पोहोचल्यावर तेथे गुरुभक्ती व महाआरतीचे आयोजन करण्यात आलेे. यानिमित्ताने एक शाम प्रभु के नामचे सुंदर सादरीकरण करण्याकरिता मयूर जैन, इंदौर यांनी सुमधुर सुरांवर सादर झालेल्या भक्तिगीतांवर भाविकांनी मोठ्या भावुकतेने नृत्य केले. पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाच्या संपूर्ण सात दिवसांच्या सकाळ व संध्याकाळ भोजनाचा लाभ संजय जैन हिंगणघाट परिवाराकडून देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात संजय साखरे, संजय जैन, दिनेश कोचर, भागचंद ओस्तवाल, विनोद पोतदार, अमोल बिडकर, सुशिल वाकेकर, अभिषेक दोषी, मिलींद जैन, राजेश कोचर, दर्शन बाळापुरे, सौ. सुषमा जैन, गिरीश वाकेकर, प्रिन्स जैन, संदिप विंदाने, शितल नायगावकर, गौरव गडेकर, त्रिशुल जैन, पारस जैन, अनिल जैन, पं. दिपक उपाध्ये (प्रतिष्ठाचार्य), राजेंद्र जैन (मंच कलाकार), संगीतकार विद्यासागर अकिवाट, मनोज जैन, दिपक हिवरकर, संजय चानेकर, गुलाबराव विंदाने यांच्यासह समस्त महिला व पुरुष उपस्थित होते. ही माहिती राजेश अ. कोचर यांनी दिली.