झडशी चा जयंत कोहळे झाला पी एस आय,मित्र मंडळीकडून जंगी स्वागत….

0

सेलू /आराजपत्रित गट ब (पी एस आय ) लोक सेवा आयोग 2021 चा निकाल घोषित झाला असून यात झडशी येथील जयंत राजू कोहळे याने बाजी मारली व पी एस आय होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.जयंत हा झडशी येथील रहिवाशी असून त्याने आपले प्राथमिक शिक्षण जिल्ह्या परिषद शाळेत पूर्ण केले तर हायस्कूल गावातच पूर्ण केले.इंजिनिअरिंग ची पदवी दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेज सावंगी मेघे येथे पूर्ण केले.सहा महिन्याच्या खाजगी नोकरीनंतर महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची तयारी सुरु केली. लोक सेवा आयोगाचा अभ्यास करताना कोणत्याही ट्युशन क्लास चा आधार न घेता व मोठ्या शहरात न जाता आपल्याच घरी अभ्यास केला. यात सचिन खराबे व प्रफुल गेडाम यांचेकडून शारीरिक शिक्षणाचे धडे मिळाले.जीवनात येणारे संकट व सातत्यपूर्ण अभ्यास यावर विजय मिळवीत या परीक्षेत घवघवीत यश संपादिन केले.दै. देशोन्नती चे उपसंपादक राजू कोहळे व अंगणवाडी सेविका संगीता कोहळे यांचा तो मुलगा आहे.

🔥मित्रमंडळीकडून जंगी स्वागत🔥

काल एमपी एससी परीक्षेचा निकाल घोषित होताच मित्रमंडळीकडून ढोल ताश्याच्या गजरात जयंत चे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागात कार्यरत वासीम येथील कृष्ककांत धाबे याचे सुद्धा जंगी स्वागत केले. कृष्णकांत हा देखील या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 सेलू वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!