ट्रकखाली सापडल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यू

0

 

प्रतिनिधी/ हिंगणघाट :

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील उखरडा येथील रहिवासी असलेला मृतक स्थानिक राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या आईसह सेवाग्राम येथे जाण्याकरीता निघाले असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांचे मोटरसायकल क्र.एमएच -३५-बीई १०३८ ला मागून धड़क दिली.यावेळी मोटरसाइकल अनियंत्रित होऊन अपघात घडला.यात गजानन पुसदेकर(४०) या मोटरसाइकलस्वाराचा जागीच मृत्यु झाला तर सोबत मागे बसलेली गंगाबाई पुसदेकर ही ६० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली.
सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरील महाकाली नगरी जवळ घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक क्र.एमएच-३४/ बि झेड ०१९३ चंद्रपूर येथील चड्ढा ट्रांसपोर्ट कंपनिचा होता.अपघाताची माहिती मिळताच तेथील उपस्थित नागरिकांनी तसेच पोलिसांनी जखमी महिलेस स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
सदर कारवाई हिंगणघाट पोलिस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे तसेच वाहतुक विभागाचे कर्मचाऱ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!