दत्तपुर टी पॉइंट वर दुचाकीची दुभाजकाला धडक : चालक गंभीर जखमी

0

 

सतीश अवचट / पवनार :

पवनार वरून वर्धेला परत जतांना दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. यात दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर मार लागला असून गंभीर जखमी झाला. ही घटना रात्री 8.40 च्या दरम्यान घडली. दुचाकी चालकाला रुग्णालयात नेण्यासाठी कोणतेच वाहन उपलब्ध नसल्याने तो रोडवर अर्धा तास पडून होता. काही वेळाने रुग्णवाहिका आली व उपचारासाठी त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!