देवळीतील जुन्या वादातुन ब्लेडने मारून केले जखमी…..

0

देवळी -/ येथे बसस्थानक परिसरामध्ये सायंकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान पंकज हरिभाऊ फटिंग वय 42 वर्ष हा बसस्थानक समोर हॉटेलमध्ये चाय पीत असतांना आरोपी प्रणय दिलीप मशानकर याने जुन्या वादातून वाद विवाद करून धारदार ब्लेडने वार करून जखमी केले.देवळी पोलीस स्टेशन मधून प्राप्त माहितीनुसार पंकज फटिंग हा ठोक भाजीपाल्यांचा व्यवसाय करतो तर आरोपी प्रणय मशानकर याच्याकडे भाजीपाल्याच्या पैशावरून जुना वाद होता त्यानंतर आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये अनेक वेळा तोंडी बाचाबाची झाल्या परंतु रविवारी पंकज फटिंग आपली भाजीपाल्याची वसुली करून देवळी बसस्थानक सामोरील परिसरात थांबला तेथे एका चाय टपरीवर चाय पीत असताना आरोपीने जुना वाद डोक्यात ठेवून अचानक फिर्यादीवर धारदार ब्लेडने हल्ला केला सुदैवाने फिर्यादीचा हात समोर आल्याने मानेवर बसणारा घाव हाताला लागला सुदैवाने मोठी घटना टळली त्यानंतर जखमी अवस्थेत फिर्यादीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन झालेल्या घटनेची माहिती देऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. देवळी पोलिसांनी फिर्यादीचा वैद्यकीय परीक्षण करून आरोपीवर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला पुढील तपास देवळीचे पोलीस हवालदार विनोद कांबळे व त्यांचे सहकारी करीत आहे.

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!